Skip to main content

Posts

Showing posts from May, 2014

Birthday wishes to dear daughter!

प्रिय सिया, आज तुझा ५ वा वाढदिवस ! तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! ९ मे २००९, तुझं आमच्या आयुष्यात येणं ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहे . माझ्यासाठी परिराणी आणि बाबासाठी राजकन्याच ती... आज तुझ्या पाचव्या वाढदिवसाच्या निमित्त्याने घेई पाच वर्षं जशीच्या तशी आठवताहेत... तुझं पहिलं रडणं , तुझं पहिलं हसणं , तुझा  पहिला वहिला स्पर्श, तुझं रांगणं, तुझं चालणं, तुझा पहिला दात, तुझी पहिली हाक ,... आई  !!! तुझ्या माझ्यातलं हसणं - रडणं, खेळणं  - बागडणं, घरामध्ये तुझा असलेला किलबिलाट हे दिवसभराचा सारा ताण, सारा थकवा विसरायला लावतं. तुला मोठी करता करता कधी कधी मीच  लहान होऊन  तुझ्यासवे दंगा - मस्ती , खट्याळपणा करते, तर कधी तुझा नाजूक आवाज, समजूतदारपाने बोलणं, अवचित भावनिक होऊन मला बिलगणं मला मोठं करून जातं .. अगं राणी , अगं पिल्लू, अगं मनीमाऊ, अगं चिऊ ... अशी तुझी सहस्त्रनामावली घेता घेता प्रेम, वात्सल्य , राग , रुसवा, कठोरपणा असे अनेक भाव अनुभवायला मिळतात. या साऱ्या सुखासाठी मी नियतीची खूप खूप आभारी आहे. शेवटी एवढंच म्हणते, समुद्रापरी गरजत असशी, सर...