Skip to main content

Posts

Showing posts from 2017

Reading- The key to learning

Reading- The key to learning Reading is to the mind what exercise is to the body. As a 21 st century teacher and parent, I feel it is very important to develop a habit of reading in early childhood. I still remember my school days when we used to have a library period once in a week. That day used to be a treat for a book lover girl like me. When our class teacher walked in with librarian madam and a bag full of books, we used to be super happy. That day we used to get a chance to choose a story book and enjoy it for a week. Along with this, I was lucky enough to get few teachers who were passionate about reading and books that always motivated us to read good books and increase our knowledge in various areas. On the other hand at home, my parents always encouraged me to read by bringing new books, asking me to discuss and write about it, visiting books exhibition and libraries and so on. That helped me to find the most loyal friend- book! Now a days there are numerou...

दैनंदिन आयुष्यातील समस्या परिहार

एक अनुभव आवर्जून सांगावासा वाटतो तो म्हणजे मी M.Sc ला असताना , पुणे विद्यापीठातून एक प्रदर्शन पाहून आम्ही मैत्रिणी परत येताना एक तर होस्टेलला पोहोचायला उशीर झाला होता आणि पाऊस पण येत होता म्हणून आम्ही बसमधूनउतरून फर्ग्युसन रोडवरून रिक्षाला हात केला तेव्हा दोन मुली रिक्षातून उतरल्या आणि आम्ही दोघी रिक्षात बसलो तेवढ्यात एक मोबाईल फोन आम्हाला सापडला म्हणून आम्ही रिक्षा काकांना म्हटलं कि हा मोबाईल आत्ता उतरलेल्या मुलींचा असावा तर आपण त्या मुलींच्या मागे रिक्षा घेऊ , त्यांना मोबाईल देऊ आणि जाऊ . मीटर ची चिंता तुम्ही करू नका , तुम्हाला तुमचे पैसे मिळतील . असे बोलण झाल्यावर त्याने आम्हाला साफ नकार दिला आणि आमच्या हातातून फोन हिसकावून घेतला . हे पाहून मोबाईल हडप करण्याचा त्याचा विचार आमच्या लक्षात आला आणि आम्ही त्याचाशी वाद घालायला सुरुवात केली तसे तो मानून दारूच्या नशेत असल्याचे जाणवले . तेव्हा आम्हाला प्रश्न पडला कि आता अश्या माणसाशी या वेळी वाद घालून संकट ओढवून घ्यायचा कि आपल्यासमोर कोणी चोरी करतंय तरी निमुटपणे सगळा पाहत राहायचं ?? मग आम्ही जर युक्तीने ही समस्या सोडवण्याचा विचार केला ...

"संवाद "… खरंच हरवत चाललाय का?

काल संध्याकाळचीच गोष्ट …गणेश नुकताच ऑफिसमधून आला आणि आम्ही दोघं निवांत चहा घेत गप्पा मारत होतो. बोलता बोलता असा विषय निघाला की  'नटसम्राट ' हा चित्रपट येतोय आणि आपला लाडका नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत असल्याने हा चित्रपट नक्की बघू . त्या चित्रपटातून होणार्या कमाईपैकी  ३०% रक्कम नाना पाटेकर यांना मिळतील आणि ते सगळे पैसे नाना गरजू शेतकऱ्यांसाठी वापरणार आहेत इति बरंच  काही ……। या घटनेवरून मला आठवण झाली माझ्या आजोबांची. मी कॉलेज ला असतानाची गोष्ट . मी आणि माझी बहीण आईबरोबर 'नटसम्राट ' हे नाटक पाहून आलो होतो आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी सुट्टी चा वार असल्याने आमचे आबा (आईचे वडील) आमच्या घरी आले होते. आणि मग आम्ही काल  असं असं  नाटक पाहून आलो असं सांगायचा नुसता अवकाश …त्यांनी लगेच पुढचा प्रश्न विचारला - नाटक छान होतं, खूप आवडलं , जरा  बदल झाला, इ. सगळं  छान च ! पण त्यातून काही शिकायला  मिळालं का? काही आवडलं- खटकलं का?? आणि मग आमची विचार चक्रे सुरु झाली. मग मी, माझी बहिण आणि आबा असे तिघे जण पुढे तास- दोन तास चर्चा ( वाद- संवाद) करत होतो. आणि मग एखादी व्यक्ती...

उपासना

उपासना चला उपासना करू या ... थोडं स्वतःशीच बोलू या मनातलं ईप्सित प्सत साधण्यासाठी परमेश्वराकडे शक्ती मागू या ... थोडी मानवता मागू या थोडी राष्ट्रभक्ती मागू या थोडं प्रबोधीनीपण मागू या शेवटी 'स्व' ची ओळख मागू या .... आता आत्मपरीक्षण करूच या स्वतःला शुद्ध करू या .... आपले पंचकोश आठवू या त्यांना समृद्ध करू या .... स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाऊ या अनंत आकाश गंगाना स्मरू या त्यातील आपले स्थान पाहू या .... दुर्गुण  सारे सोडू या सद् गुणांची  कास धरू या .... रोज नवे काही शिकू या आणि  'स्व' च्या कक्षा रुंदावू या .... भ्रमाचे ढग दूर  करू या विचारांचंआकाश मोकळं करू या .... नवा सूर्य  झेलण्यासाठी आपली ओंजळ रिती करू या चला... उपासना करू च या... सौ . श्रुति भिडे हिंगे ०६ जुलै २०१३

शिवजयंती

काल दि. १९ मार्च रोजी पुण्यात काही ठिकाणी शिवजयंती साजरी केलेली पहिली आणि न राहवून हे लिहितेय .  एक तर आजकाल एका व्यक्तीची जयंती २-३ वेळा साजरी करणं हे न पटण्यासारखं च आहे.  सकाळी १० च्या सुमारास सिंहगड रोडवरच्या एका सिग्नलला फूटपाथ वरून पुणेरी पगडी घातलेले , झेंडे घेतलेले, मशाल घेतलेले, गाडीचा सायलेन्सर काढलेले काही शूर-वीर चालले होते …… शिवाजी महाराजांना आपली जयंती अशी साजरी होताना पाहून आनंद होत असेल का? दिवसभर मोठ-मोठया आवाजात गाणी आणि पोवाडे कामात व्यत्यय आणत  होतेच. अशी नुसती गाणी लावून ध्वनी प्रदूषण करण्यापेक्षा त्या गाण्यांचे, पोवाड्यांचे अर्थ समजावून घेतले तर अधिक योग्य नाही का? संध्याकाळी घरी जाताना चौका-चौकात मंडळे बनवलेली, त्यामध्ये शिवाजी महाराजांचे फोटो , मूर्ती इ. ठेवून, फुलांची सुंदर आरास केलेली, मोठाल्या रांगोळ्या काढलेल्या, कर्णकर्कश आवाजात स्पीकर लावलेले, आपापल्या परीने शक्तीप्रदर्शनार्थ बोर्ड लावलेले आणि आजकालची तरुण म्हणवणारी पिढी हे सर्व पाहत निवांत बसलेली …इतकं सगळं केलं म्हणजे शिवजयंती साजरी झाली म्हणायची का? यातच एक भव्य मिरवणूक, सजवलेली गाडी, शि...

आयुष्य

आयुष्यातले अनेक प्रसंग नानाविध त्यांचे रंग काहींना शुभ्र पांढरा रंग तर काहींना कभिन्न काळा रंग ।। काही क्षण असे येतात पांढरा की काळा या प्रश्नात पाडतात दोहोंच्या छटा एकत्र असतात तेव्हा राखाड़ी रंगाचे दर्शन घडवतात ।। सरत्या काळाबरोबर बदलणारे रंग मनात उमटवतात अनेक तरंग काही यथावकश विरुन जातात पण काही जगण्याचा अर्थ शिकवून जातात ।। - श्रुति भिडेे-हिंगे।

Public transport: दळणा वळणाचे साधन ?? छे … हे तर देश व संस्कृती समजून घेण्याचे साधन !!!

गेले ४-५ महिने नॉर्वेमध्ये आल्यापासून मी दररोजच सार्वजनिक वाहनातून जाणं -येणं होत असतं. त्या दरम्यान प्रवासात केलेल्या निरीक्षणावरून हा देश, इथली माणसं, यांची संस्कृती याचे वेगवेगळेअनुभव येत असतात. युरोपातले देश हे आशियाई देशांपेक्षा पैसा आणि तंत्रज्ञान याबाबतीत प्रगत आहेत, त्यामुळे मला पुण्यात स्वतःच्या कारमधून फिरणे आणि इकडे ऑस्लोमध्ये बस, ट्राम किंवा ट्रेनने फिरणे यात फार फरक वाटला नाही. मुळातच इकडे लोकसंख्या कमी असल्याने खूप गर्दी, धक्काबुक्की हा प्रश्नच नाही आणि दुसरं म्हणजे इथल्या लोकांची शिस्तप्रियता आणि वक्तशीरपणा. कोणत्याही बसथांब्यावर गेल्यानंतर तिथे त्या रस्त्यावरून जाणाऱ्या बसेस/ ट्राम्सचे वेळापत्रक लिहिलेले असते आणि त्यांचे मार्गही नकाशाद्वारे दाखवलेले असतात. आणि पुढची गाडी किती वेळाने आहे याचे तपशील सुद्धा डिस्प्लेबोर्डवर अचूक दर्शवलेले असतात . आणि खरंच ठरलेल्या वेळेप्रमाणे गाडी येते! काही वेळा गाडीला समस्या आल्यास ट्रॅफिक कंट्रोल ची दुसरी गाडी येऊन पहिली गाडी पुनर्स्थित केली जाते. बसमध्ये चढल्यावर आपला पास, तिकीट किंवा मोबाईल ऍप वरचं तिकीट दाखवून चढायचं म्हणजे विना...

स्त्री

आज काल समाजात जे स्त्री वर्गाचा दर्शन होतें , किंवा टिव्ही वर च्या मालिका, चित्रपट यांमधून असो नाही तर आपल्या मैत्रिणी असोत की शेजारी पाजारी असोत, त्या वरून सारखं असा जाणवतं की ५० टक्के स्त्रिया आपल्या आयुष्यात सुखी आहेत पण ५० टक्के स्त्रिया वरवर हसू दाखवतात, पण त्यांच्या आयुष्यात जे काही चाललंय ते मनापासून पटलेलं नाहीये आणि जे आहे ते स्वीकारण्याची तिची मानसिक तयारीही नाहीये. आणि मग मला त्याचा उत्तर सापडलं ते असं ..... ऐका स्त्रीजन्मा तुझी कहाणी ... जन्मतःच जगाला नकोशी अस तेस मुलगा हवा म्हणून दुर्लक्षित असतेस तुझ्या बाल लीलांनी घराला हसवतेस कधी हसतेस, कधी रडतेस, बालपणात रमतेस .. जर कुठ तरुणपणी झेप घ्यायला पाहतेस पण पुन्हा समाज नियमाप्रमाणे संसार चक्रात अडकतेस कधी बायको कधी मुलगी म्हणून सर्वाना सांभाळतेस वरवर हसतेस पण आत खूप काही साठवतेस ... पण समर्पणातच आपल्या जन्माचे सार्थक आहे हे जेव्हा ओळखतेस तेव्हाच तू खऱ्या अर्थाने आनंदाने जगायला लागतेस ..... सौ. श्रुति हिंगे