प्रिय सिया,
आज तुझा ५ वा वाढदिवस ! तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
९ मे २००९, तुझं आमच्या आयुष्यात येणं ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहे .
माझ्यासाठी परिराणी आणि बाबासाठी राजकन्याच ती...
आज तुझ्या पाचव्या वाढदिवसाच्या निमित्त्याने घेई पाच वर्षं जशीच्या तशी आठवताहेत...
तुझं पहिलं रडणं , तुझं पहिलं हसणं , तुझा पहिला वहिला स्पर्श,
तुझं रांगणं, तुझं चालणं, तुझा पहिला दात,
तुझी पहिली हाक ,... आई !!!
तुझ्या माझ्यातलं हसणं - रडणं, खेळणं - बागडणं, घरामध्ये तुझा असलेला किलबिलाट
हे दिवसभराचा सारा ताण, सारा थकवा विसरायला लावतं.
तुला मोठी करता करता कधी कधी मीच लहान होऊन तुझ्यासवे दंगा - मस्ती , खट्याळपणा करते,
तर कधी तुझा नाजूक आवाज, समजूतदारपाने बोलणं, अवचित भावनिक होऊन मला बिलगणं
मला मोठं करून जातं ..
अगं राणी , अगं पिल्लू, अगं मनीमाऊ, अगं चिऊ ... अशी तुझी सहस्त्रनामावली घेता घेता
प्रेम, वात्सल्य , राग , रुसवा, कठोरपणा असे अनेक भाव अनुभवायला मिळतात.
या साऱ्या सुखासाठी मी नियतीची खूप खूप आभारी आहे.
शेवटी एवढंच म्हणते,
समुद्रापरी गरजत असशी, सरोवरापरी स्तब्ध हो
मोत्याहूनही नाजूक असशी, हिऱ्याहूनही कठोर हो
चंद्राहूनही शीतल असशी, सूर्यापरी तेजस्वी हो
पाखरापरी निष्पाप असशी, गरुडभरारी घेणारी हो
तुझीच लाडकी,
श्रुति भिडे- हिंगे

Comments
Post a Comment