"मैत्री "
मैत्री म्हणजे काय असतं ?
प्रेम असतं विश्वास असतो ….
लांबच लांब गप्पा मारताना
कुणीतरी अगदी जवळचं असतं . …
एक हक्काचा सुरक्षित ठिकाण असतं
जिथं आपलं मन मोकळं करत असतो ….
ओळख ही मैत्रीची पहिली पायरी असते
व्यक्तीची आधी ओळख होते ….
मग विचारांची ओळख होते
नंतर मना -मनांची पारख होते….
प्रिझम मधून प्रकाशाचे इंद्रधनू तयार होते
तसेच भावनांच्या विचारांचे जग सार्थ होते ….
मैत्रीमध्ये काही थोडे गुण दोष असतात
पण सात रंग एकत्र येउन अधिक सुंदर दिसतात ….
श्रुति
Comments
Post a Comment