Skip to main content

Posts

गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी !

ज़िन्दगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मकाम वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते या गाण्याची ओळी गेली अनेक वर्षे  मनात रुंजी घालताहेत पण नक्की का आणि काय वाटतंय हे व्यक्त व्हायला मात्र आजचा दिवस उजाडला. निमित्त आषाढी एकादशीचं. जशी आषाढी एकादशी जवळ येते, वारीची क्षणचित्रे आणि बातम्या येऊ लागतात तसं  मन भूतकाळाचा वेध घेऊ लागतं. आणि याला कारणही तसंच आहे, ते म्हणजे  माझे आजी आजोबा. आता आजोबांना जाऊन १५ आणि आजीला जाऊन ५ वर्षे होऊन गेली पण ह्या व्यक्ती, त्यांच्या आठवणी मात्र आजही मनात तितक्याच स्पष्ट. कदाचित वाढत्या वयाबरोबर  आणि अनुभवाबरोबर जाणीवा  अजूनच तीव्र झाल्या असतील कदाचित. आणि म्हणूनच आज हा लेखनप्रपंच. गेले काही वर्षं मी न चुकता व्हाट्सअँप स्टेटस ला एक फोटो आणि ओळ लावते, ती म्हणजे " आषाढी एकादशी म्हणजे तुमची आठवण येतेच. साक्षात विठोबा रखुमाईच !! " तर ही  गोष्ट आहे एका खऱ्या खुऱ्या विठोबा रखुमाईची म्हणजेच माझे आजी आणि आबा. (माझ्या आईचे आई वडील ) यांची . सुधा आजी म्हटलं कि आजही डोळे मिटल्या वर गोरीपान, हसतमुख, बेताची उंची, गोबरे गाल, मोठं कुंकू, विरळ पण काळेभो...
Recent posts

My New Experiment in Formative Assessment!

  My New Experiment in Formative Assessment!   This year, I once again taught science to 11th graders, and the thought of trying something new crossed my mind. This time, it wasn't about teaching but about evaluation. As a teacher, we always think of a variety of ways to assess students' understanding of the topic. The basic principle of this experiment was to give students an opportunity to be judged based on their own choice of expression. Over my 10 years of teaching practice, I have observed that when a test is announced, a few happy faces eagerly step forward to prove their knowledge, while many others get nervous, imagining all the efforts required to learn the concepts, remember the terms, and reproduce them in an exam situation. That's why I decided to give my students an opportunity to express their knowledge and understanding of the topic in various ways of their choosing. My only concern was to test their understanding of the topic, use of correct terminologi...

रक्षाबंधन

रक्षाबंधन आज रक्षाबंधन! बहिणीने भावाला राखी बांधून आपल्या रक्षणार्थ सदैव सोबत असण्याची आठवण करून देणारा आणि बहीण- भावाचे नाते साजरे करण्याचा दिवस. लहानपणी राखीपौर्णिमा म्हणजे शाळेला सुट्टी आणि गोड-धोड खाऊन भरपूर भेटवस्तू घेऊन दंगा- मस्ती करण्याचा दिवस इतकीच समजूत होती. पण या निमित्ताने मला शाळेतील एक प्रथा आठवतेय ती म्हणजे रक्षाबंधनाला आम्हाला अनाथ आश्रमातल्या मुलांना राखी बांधायला नेलं जायचं आणि त्यांना सख्खं भावंड नाही म्हणून आपण त्यांना आनंद द्यायला एक दिवस केलेला प्रयत्न हा एक अर्थ कळला होता. तसेच सीमेवरच्या जवानांना राखी पाठवून आपल्या संरक्षणार्थ केलेल्या कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं आणखी एक स्वरूप. पण आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक नवीन अर्थ मांडावासा वाटतोय. तो म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व पुरुषवर्गाचा आपल्याला असणारा आधार आणि पाठिंबा ज्या मुळे आज आपण इतक्या बिनधास्तपणे जगभर फिरू शकतो. आणि कळत- नकळत ही सुरक्षितता प्रदान करणाऱ्या माझ्या सर्व बंधूंसम असणाया मित्रवर्गाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ! श्रुति भिडे - हिंगे

मैत्री

"मैत्री " मैत्री म्हणजे काय असतं ? प्रेम असतं विश्वास असतो …. लांबच लांब गप्पा मारताना कुणीतरी अगदी जवळचं असतं . … एक हक्काचा सुरक्षित ठिकाण असतं जिथं आपलं मन मोकळं करत असतो …. ओळख ही मैत्रीची पहिली पायरी असते व्यक्तीची आधी ओळख होते …. मग विचारांची ओळख होते नंतर मना -मनांची पारख होते…. प्रिझम मधून प्रकाशाचे इंद्रधनू तयार होते तसेच भावनांच्या विचारांचे जग सार्थ होते …. मैत्रीमध्ये काही थोडे गुण दोष असतात पण सात रंग एकत्र येउन अधिक सुंदर दिसतात …. श्रुति

देवल सर

कन्या शाळेच्या वॉट्स अप ग्रुप वर आज हि बातमी वाचली आणि माझी विचारचक्रे परत एकदा सुरु झाली. देवल सर हे माझ्या शालेय जीवनातील आदर्शांपैकी एक . ५ वी ला गेल्या नंतर हे आपले पर्येवेक्षक आणि इतिहासाचे शिक्षक अशी ओळख झाली पण येणाऱ्या काही वर्षांत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंची ओळख होत गेली. चित्रकला हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय होता.. तसेच ऑफ तासाला त्यांच्या काढून गोष्टी ऐकायला मिळणे म्हणजे परवणीच . त्यामुळे आज एखादा रिकामा तास आहे तर हमखास देवल सर च यावेत अशी मनोमन प्रार्थना करायचो आम्ही आणि एकदा भुताच्या गोष्टी रंगल्या की पुढच्या तासाचा शिक्षक बाहेर वाट पाहत आणि आमच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहत उभा असणार हे नक्की. जितक्या तन्मयतेने ते गोष्टी रंगवून सांगायचे तितक्याच उत्तम दर्जाचे त्यांचे विविध गुण वार्षिक स्नेहसंमेलनाला पाहायला मिळायचे. आमच्या शाळेत एक अलिखित प्रथा होती ती म्हणजे दरवर्षी गॅदरिंगला शिक्षकांचं एक नाटक असणारच. आणि त्यात आम्हाला यांचे गायन, वादन, अभिनय असे अनेक पैलू अनुभवायला मिळायचे. बरं हे सर जितके रसिक तितकेच कडक शिस्तीचे. मला माझा शाळेच्या पूर्ण १० वर्षात २ वे...

मॅपल ट्री

मॅपल ट्री यशराज फिल्म्सच्या मोहोब्बतें सिनेमाच्या सुरुवातीला टायटल पडतात तेव्हा वाऱ्याबरोबर वाहत येणारी आणि तेव्हा पासून मनात भरलेली ती मॅपल ट्री ची पाने वास्तवात पहिल्यांदा पाहायला मिळाली ती युरोपात आल्यानंतर. गेल्या दोन तीन वर्षांत नियमितपणे मला दिसणारी मॅपल ट्री आणि तिच्यातील बदल यातून प्रेरणा घेऊन काही लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न! भारतातून युरोपात आल्यानंतर अनेक गोष्टी मला नवीन होत्या त्यातील काही भावल्या तर काही खटकल्या. पण या मध्ये ऋतूंबद्दल खूप काही पाहायला अनुभवायला मिळालं आणि नकळत च त्याबरोबर काही विचार चक्रं चालू झाली. भारतात जसे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू प्रामुख्याने दिसतात तसे इकडे स्प्रिंग, समर, ऑटम आणि विंटर असतात आणि त्यातले नैसर्गिक बदल अगदी ठळकपणे अनुभवता येतात. त्यातलं एक माध्यम म्हणजे इथली झाडं. त्यातलंच माझं एक आवडतं झाड म्हणजे मॅपल ट्री.. माझ्या घराच्या खिडकीतून दिसणारी ती मॅपल ट्री म्हणजे माझी नॉर्वेतली पहिली मैत्रीण! प्रत्येक वेळेस मैत्रीण म्हणजे कोणी व्यक्तीच हवी आणि ती बोललीच पाहिजे असं नाही हे मला पहिल्यांदा लक्षात आलं....

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा मला कळायला लागल्यापासून ते आज पर्यंत अनेक ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी केलेली पहिली आहे. शाळेत असताना व्यास पौर्णिमा म्हणजे काय व ती का साजरी करायची हे शिकण्यापासून ते विविध मंदिरे, मठ, संस्था इत्यादींमध्ये याचे स्वरूप बदलत जाताना दिसते. पण खरं गुरु पूजन म्हणज गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे आचरण करणे. माझ्या आजवरच्या आयुष्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन करणारे गुरु वेगवेगळ्या वळणावर भेटत गेले. १. भारतीय संस्कृतीमधील देवदेवता ज्यांच्या गोष्टी ऐकत मोठे झालो त्या राम, कृष्ण यांपासून ते त्यांची शिकवण समजावून देणाऱ्या ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव या संतमंडळींपर्यंत. २. जन्माला आल्यापासून जे बोलायला चालायला शिकवणारे ए आई, बाबा, आजी आजोबा पासून ते बायको, सून, आई या भूमिका निभावताना साथ देणारे ओ आई, बाबा, आजी आणि सर्व नातलग. ३. शाळा आणि कॉलेजमध्ये असताना भाषा, गणित, विज्ञान, कला ह्याचे शिक्षण देणारे शिक्षक. ४. समाजात वावरत असताना दिशा दर्शन करणारे स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास इथपासून ते सावरकर, टिळकांपर्यंत. आणि शिवाजी महार...