Skip to main content

देवल सर

कन्या शाळेच्या वॉट्स अप ग्रुप वर आज हि बातमी वाचली आणि माझी विचारचक्रे परत एकदा सुरु झाली. देवल सर हे माझ्या शालेय जीवनातील आदर्शांपैकी एक . ५ वी ला गेल्या नंतर हे आपले पर्येवेक्षक आणि इतिहासाचे शिक्षक अशी ओळख झाली पण येणाऱ्या काही वर्षांत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंची ओळख होत गेली. चित्रकला हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय होता.. तसेच ऑफ तासाला त्यांच्या काढून गोष्टी ऐकायला मिळणे म्हणजे परवणीच . त्यामुळे आज एखादा रिकामा तास आहे तर हमखास देवल सर च यावेत अशी मनोमन प्रार्थना करायचो आम्ही आणि एकदा भुताच्या गोष्टी रंगल्या की पुढच्या तासाचा शिक्षक बाहेर वाट पाहत आणि आमच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहत उभा असणार हे नक्की. जितक्या तन्मयतेने ते गोष्टी रंगवून सांगायचे तितक्याच उत्तम दर्जाचे त्यांचे विविध गुण वार्षिक स्नेहसंमेलनाला पाहायला मिळायचे. आमच्या शाळेत एक अलिखित प्रथा होती ती म्हणजे दरवर्षी गॅदरिंगला शिक्षकांचं एक नाटक असणारच. आणि त्यात आम्हाला यांचे गायन, वादन, अभिनय असे अनेक पैलू अनुभवायला मिळायचे. बरं हे सर जितके रसिक तितकेच कडक शिस्तीचे. मला माझा शाळेच्या पूर्ण १० वर्षात २ वेळा देवल सरांकडून शिक्षा झालेली आठवते. एकदा शाळेत उशिरा आले होते म्हणून लाकडी पट्टीने हातावर छडी मिळाली होती ती आज पर्यंत लक्षात राहिलीये. आणि त्या नंतर शाळेत च काय कुठेही उशिरा जाण्याची माझी काय बिशाद!! दुसरी गोष्ट म्हणजे मी इतिहास नागरिक शास्त्राच्या तासाला घरचा अभ्यास पूर्ण केला नाही म्हणून मला आणि बऱ्याच मुलींना त्या दिवशी वर्गाच्या बाहेर उभं केलं होतं. त्या दिवशी वर्गात काय शिकवताहेत हे खिडकी मधून ऐकायला लागल्यानंतर शिक्षकांची खरी किंमत कळली. आणि अश्या गोष्टी शाळेत घडल्यावर आमच्या आई बाबांना पण यावर काही आक्षेप नसायचा आणि आम्ही पण अशा प्रसंगांना सुधारण्याची एक संधी म्हणून पाहायचो . पण आता शाळा, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि समाज हे सगळेच बदलताहेत. हे आजच्या पिढीला कसा समजावून सांगायचं? आणि मला हा प्रश्न पडायला तुम्हाला देवाघरी जाण्याची वेळ उजाडली हे दुर्दैवच. पण तुम्ही दिलेली शिकवण आयुष्यभर लक्षात ठेवेन आणि येणाऱ्या पिढ्यांना देण्यातही हातभार लावेन हे आश्वासन नक्कीच देईन.
एक नम्र विद्यार्थिनी,
श्रुति भिडे - हिंगे

Comments

Popular posts from this blog

Reading- The key to learning

Reading- The key to learning Reading is to the mind what exercise is to the body. As a 21 st century teacher and parent, I feel it is very important to develop a habit of reading in early childhood. I still remember my school days when we used to have a library period once in a week. That day used to be a treat for a book lover girl like me. When our class teacher walked in with librarian madam and a bag full of books, we used to be super happy. That day we used to get a chance to choose a story book and enjoy it for a week. Along with this, I was lucky enough to get few teachers who were passionate about reading and books that always motivated us to read good books and increase our knowledge in various areas. On the other hand at home, my parents always encouraged me to read by bringing new books, asking me to discuss and write about it, visiting books exhibition and libraries and so on. That helped me to find the most loyal friend- book! Now a days there are numerou...

मैत्री

"मैत्री " मैत्री म्हणजे काय असतं ? प्रेम असतं विश्वास असतो …. लांबच लांब गप्पा मारताना कुणीतरी अगदी जवळचं असतं . … एक हक्काचा सुरक्षित ठिकाण असतं जिथं आपलं मन मोकळं करत असतो …. ओळख ही मैत्रीची पहिली पायरी असते व्यक्तीची आधी ओळख होते …. मग विचारांची ओळख होते नंतर मना -मनांची पारख होते…. प्रिझम मधून प्रकाशाचे इंद्रधनू तयार होते तसेच भावनांच्या विचारांचे जग सार्थ होते …. मैत्रीमध्ये काही थोडे गुण दोष असतात पण सात रंग एकत्र येउन अधिक सुंदर दिसतात …. श्रुति

गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी !

ज़िन्दगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मकाम वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते या गाण्याची ओळी गेली अनेक वर्षे  मनात रुंजी घालताहेत पण नक्की का आणि काय वाटतंय हे व्यक्त व्हायला मात्र आजचा दिवस उजाडला. निमित्त आषाढी एकादशीचं. जशी आषाढी एकादशी जवळ येते, वारीची क्षणचित्रे आणि बातम्या येऊ लागतात तसं  मन भूतकाळाचा वेध घेऊ लागतं. आणि याला कारणही तसंच आहे, ते म्हणजे  माझे आजी आजोबा. आता आजोबांना जाऊन १५ आणि आजीला जाऊन ५ वर्षे होऊन गेली पण ह्या व्यक्ती, त्यांच्या आठवणी मात्र आजही मनात तितक्याच स्पष्ट. कदाचित वाढत्या वयाबरोबर  आणि अनुभवाबरोबर जाणीवा  अजूनच तीव्र झाल्या असतील कदाचित. आणि म्हणूनच आज हा लेखनप्रपंच. गेले काही वर्षं मी न चुकता व्हाट्सअँप स्टेटस ला एक फोटो आणि ओळ लावते, ती म्हणजे " आषाढी एकादशी म्हणजे तुमची आठवण येतेच. साक्षात विठोबा रखुमाईच !! " तर ही  गोष्ट आहे एका खऱ्या खुऱ्या विठोबा रखुमाईची म्हणजेच माझे आजी आणि आबा. (माझ्या आईचे आई वडील ) यांची . सुधा आजी म्हटलं कि आजही डोळे मिटल्या वर गोरीपान, हसतमुख, बेताची उंची, गोबरे गाल, मोठं कुंकू, विरळ पण काळेभो...