गुरुपौर्णिमा
मला कळायला लागल्यापासून ते आज पर्यंत अनेक ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी केलेली पहिली आहे. शाळेत असताना व्यास पौर्णिमा म्हणजे काय व ती का साजरी करायची हे शिकण्यापासून ते विविध मंदिरे, मठ, संस्था इत्यादींमध्ये याचे स्वरूप बदलत जाताना दिसते. पण खरं गुरु पूजन म्हणज गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे आचरण करणे. माझ्या आजवरच्या आयुष्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन करणारे गुरु वेगवेगळ्या वळणावर भेटत गेले.
१. भारतीय संस्कृतीमधील देवदेवता ज्यांच्या गोष्टी ऐकत मोठे झालो त्या राम, कृष्ण यांपासून ते त्यांची शिकवण समजावून देणाऱ्या ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव या संतमंडळींपर्यंत.
२. जन्माला आल्यापासून जे बोलायला चालायला शिकवणारे ए आई, बाबा, आजी आजोबा पासून ते बायको, सून, आई या भूमिका निभावताना साथ देणारे ओ आई, बाबा, आजी आणि सर्व नातलग.
३. शाळा आणि कॉलेजमध्ये असताना भाषा, गणित, विज्ञान, कला ह्याचे शिक्षण देणारे शिक्षक.
४. समाजात वावरत असताना दिशा दर्शन करणारे स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास इथपासून ते सावरकर, टिळकांपर्यंत. आणि शिवाजी महाराजांपासून ते विनोबा, आमटे आणि कुरियन यांपर्यंत सर्व.
५. विविध पुस्तकांमधून भेटत गेलेले शास्त्रज्ञ डार्विन, न्यूटन, आईन्स्टाईन आणि अब्दुल कलाम यांपासून ते पु. लं, देशपांडे, व. पु. काळे आणि अगदी चेतन भगतांपर्यंत सर्व लेखक मंडळी.
६. व्यावहारिक जगात माझा नोकरीच्या ठिकाणी भेटलेले अनेक सहकारी व मिळालेले अनेक अनुभव. आणि त्यापैकी एक आणि एकमेव माझा तत्वांना पोषक वातावरण देणारी ज्ञान प्रबोधिनी. ज्ञान प्रबोधिनीमधील संचालकांपासून ते प्राचार्य आणि अध्यापक सहकार्यांपासून ते आजी-माजी विद्यार्थी विद्यार्थिनींपर्यंत सर्व मंडळी.
७. सगळ्यात शेवटी पण तितकेच महत्वाचे असे माझे सगळे मित्र मैत्रिणी ज्यांच्याकडून कसे वागावे आणि आणि कसे वागू नये हे समजत गेले अशी लोकं...
अशा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्ञान देणाऱ्या माझा सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त त्रिवार वंदन.
सौ. श्रुति भिडे- हिंगे
Comments
Post a Comment