एक अनुभव आवर्जून सांगावासा वाटतो तो म्हणजे मी M.Sc ला असताना, पुणे विद्यापीठातून एक प्रदर्शन पाहून आम्ही मैत्रिणी परत येताना एक तर होस्टेलला पोहोचायला उशीर झाला होता आणि पाऊस पण येत होता म्हणून आम्ही बसमधूनउतरून फर्ग्युसन रोडवरून रिक्षाला हात केला तेव्हा दोन मुली रिक्षातून उतरल्या आणि आम्ही दोघी रिक्षात बसलो तेवढ्यात एक मोबाईल फोन आम्हाला सापडला म्हणून आम्ही रिक्षा काकांना म्हटलं कि हा मोबाईल आत्ता उतरलेल्या मुलींचा असावा तर आपण त्या मुलींच्या मागे रिक्षा घेऊ, त्यांना मोबाईल देऊ आणि जाऊ. मीटर ची चिंता तुम्ही करू नका, तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. असे बोलण झाल्यावर त्याने आम्हाला साफ नकार दिला आणि आमच्या हातातून फोन हिसकावून घेतला. हे पाहून मोबाईल हडप करण्याचा त्याचा विचार आमच्या लक्षात आला आणि आम्ही त्याचाशी वाद घालायला सुरुवात केली तसे तो मानून दारूच्या नशेत असल्याचे जाणवले. तेव्हा आम्हाला प्रश्न पडला कि आता अश्या माणसाशी या वेळी वाद घालून संकट ओढवून घ्यायचा कि आपल्यासमोर कोणी चोरी करतंय तरी निमुटपणे सगळा पाहत राहायचं ?? मग आम्ही जर युक्तीने ही समस्या सोडवण्याचा विचार केला. आम्ही रिक्षा काकांना अलका टोकीज च्या चौकात संभाजी पोलिस चौकीजवळ रिक्षा थांबवायला सांगितली, आणि एकीने पोलिस चौकीत जाऊन तक्रार केली. पोलिसांनी त्याच्या कडून मोबईल काढून घेतला, मग आम्ही त्यातील घर, आई,बाबा असे नंबर शोधून तिच्या घरी संपर्क केला आणि त्या मुलीचा भाऊ येउन खात्री पटवून तो मोबईल घेऊन गेला.रिक्षा वाल्याला पोलिसांनी लेखी कबुली दयायला लावली आणि आम्ही व्यवहार म्हणून त्याच्या रिक्षाचे मीटर प्रमाणे पैसे दिले आणि सांगितला कि चोराच्या रिक्षेत आम्हाला बसायचा नाही, तुम्ही जाऊ शकता. आणि मग तिथून चालत मेसमध्ये जाईपर्यंत जेवणाची वेळ संपून गेली होती, त्यामुळे भर पावसात चालत जाऊन उपाशी पोटीच झोपायला लागला हे खरय पण त्या प्रसंगामुळे काहीतरी छोटा का होईना पण पराक्रम केल्याची भावना मात्र खूप समाधान देत होती.दैनंदिन आयुष्यात प्रत्येक व्यक्तीलाच कोणत्या न कोणत्या समस्या सोडवाव्या लागतात. मग ती व्यक्ती कोणीही असो. अगदी एक वर्षाच्या मुलाला खेळ खेळताना आलेली समस्या असो किंवा शालेय वयोगटातील विद्यार्त्यांचा अभ्यासविषयक समस्या असोत. एका गृहिणीला विविध भूमिका निभावताना आलेल्या समस्या असोत कि कोण्या अधिकाऱ्याना आपली कर्तव्ये निभावताना असोत.कबड्डीच्या मैदानावर सामना संपायला शेवटचे काही सेकंद बाकी असताना एखादा धाडसी निर्णय आपल्या गटाचं भवितव्य ठरवणार असे असतांना अतिशय हुशारीने तरीपण सावधपणे निर्णय घ्यायला लागतात.ट्रेकिंगसाठी एखाद्या गड किल्ल्यावर गेले असताना मोबाईल, इंटरनेट अश्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसतात तरीही वेळेत आणि योग्य मार्ग शोधत इप्सित स्थळी पोहोचायचा असतं अश्या वेळेस आपली कौशल्य पणास लागतात हे नक्कि.विद्यार्थी जेव्हा प्रयोगशाळेत एखाद्या प्रकल्पाचे काम करत असता तेव्हा पालक आणि शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करतानाच नाकी नऊ आलेले असतानाही काहीतरी भन्नाट प्रकल्प करून दाखवण्याची जिद्दही बाळगतात आणि कमीत कमी वेळात, खर्चात आणि कष्टात उत्तम काम कसा करता येईल याच्या नवनवीन युक्त्या शोधून काढतात .जी गोष्ट परीक्षेत पेपर सोडवताना वेळ आणि गुण यांचे गणित सोडवण्यात असते तसाच काहीसा गुंता १० वी १२ वी नंतर अभ्यासाचा विषय निवडताना सोडवायला लागतो.अश्या समस्या सोडवण्यासाठी चे शिक्षण खरंच आपल्या शालेय शिक्षणातून मिळतं का? असेल तर उत्तमच पण नसेल तर त्यासाठी याचा अधिक शास्त्रीय अभ्यास करणे गरजेचे आहे.
दैनंदिन जीवनातील समस्या म्हटल्यानंतर साधारणपणे त्याचे जे प्रकार डोळ्यासमोर उभे राहतात ते पाहूया-१. व्यक्ती हाताळणे२. वेळ व परिस्थितीशी निगडीत३.तांत्रिक समस्या४.आर्थिक समस्या५. भावनिक वा मानसिक समस्या६. तात्विक प्रश्न७. सामाजिक समस्याया विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी मानसशास्त्रात काही पायऱ्या मांडून ठेवलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे-आपण एक सोपे दैनंदिन व्यवहारातील उदाहरण घेऊन ती समस्या कशी सोडवता येईल याचे टप्पे पाहूयात.गणेशोत्सवाचे दिवस आहेत आणि नेहमीचे रस्ते बंद असल्याने मला वेळेवर शाळेत पोहोचणे अवघड आहे, पण महत्वाची परीक्षा असल्याने मला शाळेत गेले च पाहिजे .
१.समस्येची व्याख्या करणे- यामध्ये नक्की समस्या कोणती आहे ते ओळखणे आणि त्याची व्याख्या करणे.उदा .वरील उदाहरणात पाहिल्यासरस्ते बंद आहेत ही एक समस्याआहे.,२.समस्येचे विश्लेषण- समस्या निश्चित झाल्यानंतर त्याचे कोणते पैलू/ घटक आहेत आणि त्यांचे संभाव्य परिणाम काय होतील याचे सविस्तर विचार करणे.उदा . शाळेत परीक्षा आहे ही पण एक प्राधान्याची गोष्ट आहे आणि वेळेवर पोहोचणं जसा महत्वाचं आहे तितकाच परीक्षेचा ताणही आहे. अश्या परिस्थितीत आत्ता मला नक्की कोणता प्रश्न सोडवायचा आहे ते मनाशी ठरवलं तर तो प्रश्न सोडवणं सोप्पं होईल३.उद्दिष्ट निश्चित करणे -आपले उद्दिष्ट कोणता प्रश्न सोडवण्याचे आहे याची स्पष्टता येणे. नाहीतर सध्या काय आहे याशी अस्पष्टता असल्याने नक्की समस्या सोडवली गेली कि नाही हे पडताळून बघता येणार नाही.उदा .मला शाळेत वेळवर पोहोचणं महत्वाचं आहे हे एकदा ठरल्यावर कसं ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणं फार काही अवघड नाही.४. संभाव्य पर्यायांचा विचार करणे - यामध्ये समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणकोणत्या मार्गाने जाता येईल याचा विचार करून अनेक कल्पना काढणे।
उदा. मला सायकल वर जाता येईल, बस मधून जाता येईल, वैयक्तिक रिक्षा करून पोहोचता येईल नाही तर पालकांना सोडायला सांगता येईल, नाही तर या उपायांपैकी १ किंवा २ उपायांचे एकत्रीकरण करता येईल५. योग्य पर्याय निवडणे- वेळ,पैसा, परिस्थिती, तत्वे या सर्वांचा विचार करून सर्वात योग्य असा पर्याय निवडणे.उदा. जिथे पर्यंत बस चालू आहेत तिथे पर्यंत जाने आणि पुढे काही अंतर चालत जाणे हा कदाचित योग्य पर्याय असेल६.कार्यवाही- ठरविलेल्या पर्यायाची कार्यवाही करून प्रत्यक्ष प्रश्न सोडवणे .उदा. किती वाजता पोहोचणे अपेक्षित आहे त्या अंदाजाने काही वेळ जास्त राखून घरातून निघणे आणि वेळेत शळेत पोहोचणे.७.मूल्यमापन- आपण जी समस्या सोडवण्यासाठी कार्यवाही केली त्यामुळे खरंच समस्या सुटली आहे कि नाही हे पडताळून पाहणे आणि जर समस्या सुटली नाही असे लक्षात आले, तर पुन्हा पहिल्या पासून समस्या परिहार करणे .उदा . आपण ठरवलेल्या मार्गाने मी योग्य वेळेत शाळेत पोहोचू शकले का आणि परीक्षेचा अनावश्यक ताण टाळू शकले का नियोजन करण्यात काही चूक झाली कि ज्याने अनावश्यक ताण वाढला आणि अपेक्षेप्रमाणे प्रश्न सुटलाच नाही? असे झाल्यास पुढच्या वेळेस अधिक कौशल्याने प्रश्न हाताळण्याची गरज आहे असे लक्षात येईल. आणि त्या प्रमाणे विचार करून समस्या सोडवल्यास आपल्या कौशल्यात भर पडत जाईलया सर्व प्रकिये मधून जात असताना अनेक कौशल्यांची गरज असते ती कदाचित आपल्याला शलेय शिक्षणातून विकसित करता येतील. त्यापैकी काही महत्वाची कौशल्ये खालील प्रमाणे -१. तार्किकविचार२.सर्जनशीलता३.उत्स्फूर्तता४.सहनशीलता( Patience )५.समयसूचकता"शिक्षण म्हणजे काही चार क्रमिक पुस्तकांचे शिक्षण आहे? शिक्षण हे त्यापेक्षा वेगळे आहे. शिक्षण हे मनुष्यघडणीसाठी, समाजघडणीसाठी आहे. शिक्षणाने राष्ट्र घडायला पाहिजे." असे सूत्र कै. अप्पांनी मांडून ठेवलेले आहे.या सूत्राचे विश्लेषण करताना असे लक्षात येते की शालेय शिक्षण हे क्रमिक पुस्तकांव्यतिरिक्त अजूनही काही क्षमता आणि कौशल्ये यांचे विकसन करण्यासाठी असायला हवे. यापैकीच एक अतिशय महत्वाचे कौशल्य म्हणजे 'समस्या परिहार'
Reading- The key to learning Reading is to the mind what exercise is to the body. As a 21 st century teacher and parent, I feel it is very important to develop a habit of reading in early childhood. I still remember my school days when we used to have a library period once in a week. That day used to be a treat for a book lover girl like me. When our class teacher walked in with librarian madam and a bag full of books, we used to be super happy. That day we used to get a chance to choose a story book and enjoy it for a week. Along with this, I was lucky enough to get few teachers who were passionate about reading and books that always motivated us to read good books and increase our knowledge in various areas. On the other hand at home, my parents always encouraged me to read by bringing new books, asking me to discuss and write about it, visiting books exhibition and libraries and so on. That helped me to find the most loyal friend- book! Now a days there are numerou...
Comments
Post a Comment