उपासना
चला उपासना करू या ...
थोडं स्वतःशीच बोलू या
मनातलं ईप्सित प्सत साधण्यासाठी
परमेश्वराकडे शक्ती मागू या ...
थोडी मानवता मागू या
थोडी राष्ट्रभक्ती मागू या
थोडं प्रबोधीनीपण मागू या
शेवटी 'स्व' ची ओळख मागू या ....
आता आत्मपरीक्षण करूच या
स्वतःला शुद्ध करू या ....
आपले पंचकोश आठवू या
त्यांना समृद्ध करू या ....
स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाऊ या
अनंत आकाश गंगाना स्मरू या
त्यातील आपले स्थान पाहू या ....
दुर्गुण सारे सोडू या
सद् गुणांची कास धरू या ....
रोज नवे काही शिकू या
आणि 'स्व' च्या कक्षा रुंदावू या ....
भ्रमाचे ढग दूर करू या
विचारांचंआकाश मोकळं करू या ....
नवा सूर्य झेलण्यासाठी
आपली ओंजळ रिती करू या
चला... उपासना करू च या...
सौ . श्रुति भिडे हिंगे
०६ जुलै २०१३
चला उपासना करू या ...
थोडं स्वतःशीच बोलू या
मनातलं ईप्सित प्सत साधण्यासाठी
परमेश्वराकडे शक्ती मागू या ...
थोडी मानवता मागू या
थोडी राष्ट्रभक्ती मागू या
थोडं प्रबोधीनीपण मागू या
शेवटी 'स्व' ची ओळख मागू या ....
आता आत्मपरीक्षण करूच या
स्वतःला शुद्ध करू या ....
आपले पंचकोश आठवू या
त्यांना समृद्ध करू या ....
स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाऊ या
अनंत आकाश गंगाना स्मरू या
त्यातील आपले स्थान पाहू या ....
दुर्गुण सारे सोडू या
सद् गुणांची कास धरू या ....
रोज नवे काही शिकू या
आणि 'स्व' च्या कक्षा रुंदावू या ....
भ्रमाचे ढग दूर करू या
विचारांचंआकाश मोकळं करू या ....
नवा सूर्य झेलण्यासाठी
आपली ओंजळ रिती करू या
चला... उपासना करू च या...
सौ . श्रुति भिडे हिंगे
०६ जुलै २०१३
Comments
Post a Comment