आयुष्यातले अनेक प्रसंग
नानाविध त्यांचे रंग
काहींना शुभ्र पांढरा रंग
तर काहींना कभिन्न काळा रंग ।।
काही क्षण असे येतात
पांढरा की काळा या प्रश्नात पाडतात
दोहोंच्या छटा एकत्र असतात
तेव्हा राखाड़ी रंगाचे दर्शन घडवतात ।।
सरत्या काळाबरोबर बदलणारे रंग
मनात उमटवतात अनेक तरंग
काही यथावकश विरुन जातात
पण काही जगण्याचा अर्थ शिकवून जातात ।।
- श्रुति भिडेे-हिंगे।
नानाविध त्यांचे रंग
काहींना शुभ्र पांढरा रंग
तर काहींना कभिन्न काळा रंग ।।
काही क्षण असे येतात
पांढरा की काळा या प्रश्नात पाडतात
दोहोंच्या छटा एकत्र असतात
तेव्हा राखाड़ी रंगाचे दर्शन घडवतात ।।
सरत्या काळाबरोबर बदलणारे रंग
मनात उमटवतात अनेक तरंग
काही यथावकश विरुन जातात
पण काही जगण्याचा अर्थ शिकवून जातात ।।
- श्रुति भिडेे-हिंगे।
Comments
Post a Comment