आज काल समाजात जे स्त्री वर्गाचा दर्शन होतें , किंवा टिव्ही वर च्या मालिका, चित्रपट यांमधून असो नाही तर आपल्या मैत्रिणी असोत की शेजारी पाजारी असोत, त्या वरून सारखं असा जाणवतं की ५० टक्के स्त्रिया आपल्या आयुष्यात सुखी आहेत पण ५० टक्के स्त्रिया वरवर हसू दाखवतात, पण त्यांच्या आयुष्यात जे काही चाललंय ते मनापासून पटलेलं नाहीये आणि जे आहे ते स्वीकारण्याची तिची मानसिक तयारीही नाहीये. आणि मग मला त्याचा उत्तर सापडलं ते असं .....
ऐका स्त्रीजन्मा तुझी कहाणी ...
ऐका स्त्रीजन्मा तुझी कहाणी ...
जन्मतःच जगाला नकोशी असतेस
मुलगा हवा म्हणून दुर्लक्षित असतेस
तुझ्या बाल लीलांनी घराला हसवतेस
कधी हसतेस, कधी रडतेस, बालपणात रमतेस ..
जर कुठ तरुणपणी झेप घ्यायला पाहतेस
पण पुन्हा समाज नियमाप्रमाणे संसार चक्रात अडकतेस
कधी बायको कधी मुलगी म्हणून सर्वाना सांभाळतेस
वरवर हसतेस पण आत खूप काही साठवतेस ...
पण समर्पणातच आपल्या जन्माचे सार्थक आहे हे जेव्हा ओळखतेस
तेव्हाच तू खऱ्या अर्थाने आनंदाने जगायला लागतेस .....
सौ. श्रुति हिंगे
मुलगा हवा म्हणून दुर्लक्षित असतेस
तुझ्या बाल लीलांनी घराला हसवतेस
कधी हसतेस, कधी रडतेस, बालपणात रमतेस ..
जर कुठ तरुणपणी झेप घ्यायला पाहतेस
पण पुन्हा समाज नियमाप्रमाणे संसार चक्रात अडकतेस
कधी बायको कधी मुलगी म्हणून सर्वाना सांभाळतेस
वरवर हसतेस पण आत खूप काही साठवतेस ...
पण समर्पणातच आपल्या जन्माचे सार्थक आहे हे जेव्हा ओळखतेस
तेव्हाच तू खऱ्या अर्थाने आनंदाने जगायला लागतेस .....
सौ. श्रुति हिंगे
Comments
Post a Comment