काल दि. १९ मार्च रोजी पुण्यात काही ठिकाणी शिवजयंती साजरी केलेली पहिली आणि न राहवून हे लिहितेय .
एक तर आजकाल एका व्यक्तीची जयंती २-३ वेळा साजरी करणं हे न पटण्यासारखं च आहे.
सकाळी १० च्या सुमारास सिंहगड रोडवरच्या एका सिग्नलला फूटपाथ वरून पुणेरी पगडी घातलेले , झेंडे घेतलेले, मशाल घेतलेले, गाडीचा सायलेन्सर काढलेले काही शूर-वीर चालले होते …… शिवाजी महाराजांना आपली जयंती अशी साजरी होताना पाहून आनंद होत असेल का?
दिवसभर मोठ-मोठया आवाजात गाणी आणि पोवाडे कामात व्यत्यय आणत होतेच. अशी नुसती गाणी लावून ध्वनी प्रदूषण करण्यापेक्षा त्या गाण्यांचे, पोवाड्यांचे अर्थ समजावून घेतले तर अधिक योग्य नाही का?
संध्याकाळी घरी जाताना चौका-चौकात मंडळे बनवलेली, त्यामध्ये शिवाजी महाराजांचे फोटो , मूर्ती इ. ठेवून, फुलांची सुंदर आरास केलेली, मोठाल्या रांगोळ्या काढलेल्या, कर्णकर्कश आवाजात स्पीकर लावलेले, आपापल्या परीने शक्तीप्रदर्शनार्थ बोर्ड लावलेले आणि आजकालची तरुण म्हणवणारी पिढी हे सर्व पाहत निवांत बसलेली …इतकं सगळं केलं म्हणजे शिवजयंती साजरी झाली म्हणायची का?
यातच एक भव्य मिरवणूक, सजवलेली गाडी, शिवाजी, मावळे, ढोल-ताशे, इत्यादी बऱ्याच गोष्टी!!! पण यातून त्या काळच्या रामराज्याची-भव्यतेची कल्पना तर नक्की येते, पण त्यांच्या विचारांची आणि पराक्रमाची भव्यता खरंच अनुभवू शकतो का?
खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी कराची असेल तर आपण या दिवशी शिवाजी महाराजांचे चरित्र किंवा अन्य पुस्तकं वाचून, त्यावर गटचर्चा करू शकतो का? त्यांचे चांगले गुण आपल्या पुढच्या पिढीसमोर मांडू शकतो का? दुसऱ्याला शिकवणं जाऊ दे, स्वतःच्या आयुष्यात या निमित्ताने शिवाजी महाराजांचा एखादा चांगला गुण अंगीकारण्यासाठी छोटासा संकल्प करू शकतो का? कदाचित आणखी बराच काही करू शकतो…
तुम्हालाही माझं म्हणणं पटलं असेल तर तुम्ही काय करणार या निमित्ताने? चला सांगा पाहू ? ? ? ? ?

Comments
Post a Comment