काल संध्याकाळचीच गोष्ट …गणेश नुकताच ऑफिसमधून आला आणि आम्ही दोघं निवांत चहा घेत गप्पा मारत होतो. बोलता बोलता असा विषय निघाला की 'नटसम्राट ' हा चित्रपट येतोय आणि आपला लाडका नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत असल्याने हा चित्रपट नक्की बघू . त्या चित्रपटातून होणार्या कमाईपैकी ३०% रक्कम नाना पाटेकर यांना मिळतील आणि ते सगळे पैसे नाना गरजू शेतकऱ्यांसाठी वापरणार आहेत इति बरंच काही ……।
या घटनेवरून मला आठवण झाली माझ्या आजोबांची. मी कॉलेज ला असतानाची गोष्ट . मी आणि माझी बहीण आईबरोबर 'नटसम्राट ' हे नाटक पाहून आलो होतो आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी सुट्टी चा वार असल्याने आमचे आबा (आईचे वडील) आमच्या घरी आले होते. आणि मग आम्ही काल असं असं नाटक पाहून आलो असं सांगायचा नुसता अवकाश …त्यांनी लगेच पुढचा प्रश्न विचारला - नाटक छान होतं, खूप आवडलं , जरा बदल झाला, इ. सगळं छान च ! पण त्यातून काही शिकायला मिळालं का? काही आवडलं- खटकलं का?? आणि मग आमची विचार चक्रे सुरु झाली. मग मी, माझी बहिण आणि आबा असे तिघे जण पुढे तास- दोन तास चर्चा ( वाद- संवाद) करत होतो. आणि मग एखादी व्यक्ती त्याच्या करियर मध्ये खूप यशस्वी म्हणून नावाजली जाते तरी व्यक्ती म्हणून, कुटुंबाचा सदस्य म्हणून योग्य ठरतेच असं नाही. आणि आजच्या काळात वर्क लाइफ बॅलन्स या नावाखाली आपण जे जे काही वाचतो, त्याच प्रकारची चर्चा आम्ही सुमारे १०-१२ वर्षांपूर्वी केली होती. मग अशी नाटकं बघून आपण योग्य तो बोध घेतला पाहिजे. नाही तर आयुष्य सगळे च जगत असतात पण ते अधिक अर्थपूर्ण कसं बनवता येईल या वळणावर येउन आमची गाडी अखेर थांबली.
आजही हा सगळा प्रसंग आहे तसा माझा डोळ्यासमोर उभा राहतो आणि मग एक प्रश्न सतावत राहतो कि आज काल चित्रपट, नाटक किंवा पुस्तक असा कोणताही साहित्य प्रकार संगणक, इंटरनेट, आणि मोबाईल च्या सहाय्याने आपणापर्यंत अगदी सहज येउन पोहोचतो पण त्या नंतर होणाऱ्या वाद संवादाचं काय ? आणि म्हणूनच मला क्षणभर वाटलं…… संवाद "… खरंच हरवत चाललाय का? ? ?
सौ. श्रुति भिडे- हिंगे

nice
ReplyDelete